‘एनसीबीने आर्यनला सुपर डुपर स्टार बनवलं’; राम गोपाल वर्मांची प्रतिक्रिया

ram gopal varma

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुड मध्ये नावाजलेल्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या नावाची चर्चा चित्रपटांमुळे कमी आणि इतर कारणांसाठी जास्त अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. नुकतेच ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान यांच्यावर होत असलेल्या आरोपांबत विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत लिहिले की, “शाहरुख खानच्या हुशार आणि खऱ्या चाहत्यांनी खरं तर एनसीबीचे आभार मानले पाहिजे. कारण त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला सुपर डुपर स्टार बनवलं आहे. शाहरुखचा एक सच्चा चाहता म्हणून मला फक्त जय एनसीबी असा नारा द्यावा वाटत आहे.” असं राम गोपाल वर्मा यांनी  एनसीबीने आर्यन खानला सुपरस्टार बनवल्याचं म्हंटले आहे.

आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले, “स्वतःच्या वडिलांपेक्षा तुरुंगात आणि एनसीबी कडून आयुष्याबद्दल जास्त शिकायला मिळालं हे आर्यन खान भविष्यात म्हणेल अशी मी पैज लावतो.” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “एजन्सीसह प्रत्येकाला माहित आहे की आर्यन खानवर लावलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही. निकालात विलंब करण्यासाठी सर्व युक्त्या वापरून झाल्यानंतर तो नक्कीच बाहेर येईल.” असं ही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आर्यनच्या अटकेमुळे शाहरुखची चिंता देखील वाढली असून त्याला अनेक चाहत्यांनी तसेच बॉलीवूड कलाकरांनी पाठिंबा दर्शवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या