तनुश्री दत्ताच्या विरोधात मनसे आक्रमक ; दाखल केला अदखलपात्र गुन्हा

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. बीडमधील केज पोलीस ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्षांनी तनुश्री दत्ताविरोधात तक्रार दिली असून अब्रू नुकसानीप्रकरणी तनुश्रीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाना पाटेकर प्रकरणावरुन टीका केली होती. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. राज ठाकरे हे गुंड असून नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो, असे तिने म्हटले होते.

राज ठाकरेंवरील विधानामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या केज पोलीस ठाण्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी तनुश्रीविरोधात तक्रार दिली.

You might also like
Comments
Loading...