एल्गार परिषदेचं नक्सली कनेक्शन ?

elgar prishad

पुणे – पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला असल्याची धक्कादायकमाहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही माहिती समोर आली आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचं लोण पसरावं, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटलं जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी मुंबईमध्ये नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक ‘एल्गार परिषद’चे सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे.

‘टाईम ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवरुन माहिती दिली की, ‘सुरक्षा यंत्रणांच्या रिपोर्ट्सनुसार 31 डिसेंबर 2017 च्या दिवशी पुण्यातील शनिवार वाडामधील आयोजित एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या लोकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘त्यामुळे अशा आंदोलनात एकतर नक्षलवादी घुसतात तरी किंवा अशा प्रकारे हिंसाचारही घडवतात. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत’.