fbpx

अशा हिंसाचारा विरोधात संपूर्ण देश कायम एकसंघपणे उभा राहील – राष्ट्रपती

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध .या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांप्रती सांत्वना आणि जखमी झालेले लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.अशा हिंसाचारा विरोधात संपूर्ण देश कायम एकसंघपणे उभा राहील. अशा शब्दांत कोविंद यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.