गेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर

टीम महाराष्ट्र देशा – नक्षलवादी नेता गणपथी याने गेल्या वेळी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता यावेळी काँग्रेसला पाठिंबा देऊ अशी खुली ऑफर दिल्याचा दावा छत्तीसगडमधील काँग्रेस नेते भुपेश बाघेल यांनी केला आहे. बाघेल यांनी केलेल्या दाव्यामुळे छत्तीसगडमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नक्षलवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचा देखील दावा केला आहे.

मी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मला ज्या क्रमांकावरुन फोन आला तो क्रमांकही मी पोलिसांना दिला आहे, असे बाघेल यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या वृत्तावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

नेमकं काय म्हटलं आहे छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांनी ?

‘मंगळवारी संध्याकाळी मला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख माओवादी नेता अशी करुन दिली होती. त्याने स्वतःचे नाव गणपथी असे सांगितले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला मदत केली होती. या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला मदत करु इच्छितो. ३७ जागांवर आमचा प्रभाव आहे असे त्याने सांगितले.

bagdure

‘मला या प्रकारावर संशय आला. माओवादी नेता गणपथीच्या नावाने हा फेक कॉल असावा असं मला वाटले. मी त्या व्यक्तीला प्रतिप्रश्नही केला. यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की, गणपथी नावाने तुम्हाला कधी फोन आला आहे का?, माझ्या नावाने कोणी दुसऱ्याने फोन केला तर त्याचा शिरच्छेद केला जाईल. पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्षात भेटून निवडणुकीबाबत चर्चा करु असंही तो म्हणाला.

पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय ? राहुल गांधींचा मोदींना सवाल

भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..!

 

You might also like
Comments
Loading...