मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारचा विरोध करण्याचं नक्षलवाद्यांच आवाहन

naxalites

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीयवादी असून मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारच्या धोरणाचा विरोध करा, असे आवाहन करणारी पत्रके व फलक नक्षलवाद्यांची क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना, दंडकारण्य या संघटनेने जिल्हाभर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांनाही संघटित होण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे.

कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हि पत्रके फेकली आहेत तसेच कापडी फलक लावले. पत्रक व फलकावर राज्य सरकार जातीयवादी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिदुर्गम भागात ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना संघटित होण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारच्या सांप्रदायिक नीतीचा विरोध करा, असे आवाहन करण्यात आले आहे.Loading…
Loading...