पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय; नक्षलवाद्यांनी केलीआणखी एका नागरिकाची हत्या

टीम महाराष्ट्र देशा- नक्षलवादी हल्ले थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. जवानांच्या ताफ्यांना लक्ष्य केल्यानंतर नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा आता स्थानिकांकडे वळवला आहे. गडचिरोलीतील एका नागरिकाची गावामध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. सुधीर सरकार असं या व्यक्तिचं नाव आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली.

Loading...

गडचिरोली जिह्यात 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्या शीघ्र कृती दलाचे 15 जवान शहीद झाले आहेत. ही घटना ताजी असताना पोलीसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून नागरिकांना लक्ष्य केले जात असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान,या अगोदर शनिवारी रात्री भामरागड तालुक्यातील नैनवाडी गावातील नागरिकाची देखील पोलीसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती.Loading…


Loading…

Loading...