गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा पुन्हा धुडगूस , पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामावरील वाहने जाळली

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर त्यांनी जाळपोळ केली. पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण कामावरील वाहने त्यांनी जाळली आहे. यामध्ये टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य जळून खाक झाले आहे.

Loading...

मध्यरात्री दरम्यान नक्षलवाद्यांकडून ही जाळपोळ करण्यात आली. यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा नामक ठेकेदार काम करत आहेत. तर जाळण्यात आलेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे.

काही दिवसांपूर्वीही त्यांनी येथील वाहने जाळली होती. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत काम सुरू असताना नक्षल्यांनी मजूरांना काम बंद करण्याचे फर्मान सोडले होते. सशस्त्र असलेल्या नक्षलवाद्यांनी यावेळी दोन वाहनांनाही आग लावली होती. यामध्ये अमरावतीमधील एका कंत्रादाराचे प्रचंड नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे.Loading…


Loading…

Loading...