fbpx

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देत आहे का ?

टीम महाराष्ट्र देशा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरच नक्षलवाद्यांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या वेबसाइटवर सेंटर फॉर सोशल सायन्सेस एंड हुमॅनिटीज या विभागाच्या माहितीमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहेत.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नक्षलवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहे कि काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

झी २४ तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,सरकारनं बंदी घातलेल्या नक्षली संघटना आणि जहाल माओवादी नेत्यांशी संबंधित ही माहिती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील नक्षल चळवळ, काश्मीरबाबत फुटीरतावादी विचार, राज्य पोलीस, सीआरपीएफ, ग्रे हाऊंड्स यासारखं संरक्षण दल किंवा यंत्रणा आदिवासी नागरिकांवर कशा प्रकारे अत्याचार करतात याचा तपशील या कागदपत्रांमध्ये आहे.

या संपूर्ण प्रकारच्या चौकशीची मागणी भूमकाल या नक्षलविरोधी संघटनेनं केली आहे. गेल्या ३० वर्षांत नक्षल चळवळीशी संबंधित ही कागदपत्रं पुणे विद्यापीठाला कोणी दिली? या कागदपत्रांचं वर्गीकरण कुणी केलं? वेबसाईटवर ती कुणी अपलोड केली? आणि या सगळ्या प्रकारावर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचं लक्ष होतं का ? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.