Babumoshai Bandookbaaz Teaser- नवाझुद्दीनच्या ‘बाबुमोशाय बंदुकबाझ’च टीझर रिलीज

मुंबई: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा दमदार आणि वेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून यशाचं शिखर गाठणा-या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीच्या नव्या सिनेमाची त्याच्या चाहत्यांना नेहमीच प्रतिक्षा असते. त्याच्या आणखी एक नवा सिनेमा येत असून ‘बाबुमोशाय बंदुकबाझ’ असं या सिनेमाचं टायटल आहे. या अफलातून सिनेमा टीझर रिलीज करण्यात आलाय.

‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ पासून सुरू असलेली घोडदौड कायम राहत नवाझुद्दीनने आपलं नाणं कसं खणखणीत आहे हे दाखवून दिलं आहे. सिनेमातील मुख्य हिरोला मागे टाकणा-या भूमिका त्याने साकारल्या आहेत. आता अशीच एक मध्यवर्ती भूमिका असलेला हा त्याचा सिनेमा आहे.टीझरवरून हा सिनेमात धमाल असणार हे दिसतंय.

कुशल नंदीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात नवाझ हा बाबू नावाच्या छोटेखानी काँट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी जेम्स बाँडच्या व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेतल्याचं नवाझने सांगितलं होतं. नवाझसोबत दिव्या दत्ता, बिदिता बाग, मुरली शर्मा, जतिन गोस्वामी, श्रद्धा दास, अनिल जॉर्ज, जीतू शिव्हारे, भगवान तिवारी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.