बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार नावाजुद्दीन

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या हटके अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या बयोपिक नावाजुद्दीन काम करत आहे.

मांझी द माउंटन मॅन, बदलापूर, लंचबॉक्स अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका नावाजुद्दीनने खास आपल्या स्टाईलने गाजवल्या आहेत. दरम्यान या चित्रपटा विषयी संजय राऊत यांना विचारल असता ‘बाळासाहेब हे लोकनेता होते. म्हणून हा सिनेमा फिचर फिल्मसारखाच बनवला जात आहे. याच ट्रेलर 21 डिसेंबरला रिलीज होणार असून त्यावेळी सर्व काही दिसेल’ असे सांगितले आहे.