मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित शरद पवारांना कळते – नवाब मलिक

nawab malik at ncp press

टीम महाराष्ट्र देशा : अल्पसंख्याक मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भारत – पाकिस्तानमध्ये फुट पडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण देशात बनवलं जात आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये फुट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे पाहता पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत, असं पवार यांनी म्हंटले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भाष्य केले होते. त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे. आपल्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला? याचा विचार त्यांनी करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.

नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते स्टेटमेंटच कळलं नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. पवारसाहेब म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोकं स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

बीसीसीआयचे अध्यक्ष असताना पवारसाहेब पाकिस्तानला टीमसोबत गेले होते त्यावेळी त्यांना तिथली सर्वसामान्य जनता भारताशी वैर आहे असं वागत नाहीत उलट पाहुण्यांची चांगली खातिरदारी करतात असा अनुभव आल्याचा किस्सा सांगितला होता. परंतु याच वक्तव्याचा विपर्यास करून मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानचं हित आम्हाला नाही या भाजप सरकारला आहे असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.

देशातील शेतकऱ्यांच्या  कांदयाला भाव मिळत असताना एमएमटीसीच्या माध्यमातून पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या भाजप सरकारने देशहित आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करु नये अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.