आर्यनच्या जामिनावर नवाब मलिकांची सुचक प्रतिक्रिया, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’

आर्यनच्या जामिनावर नवाब मलिकांची सुचक प्रतिक्रिया, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला दिलासा दिला आहे. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे.

आर्यन खानसह तिघांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, असं म्हटलं आहे.

या प्रकरणातील तीन मुख्य व्यक्तींना जामीन मिळाल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तपासावर शंका घेणारे नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना हे संपूर्ण प्रकरणच फर्जीवाडा असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. ‘माननीय उच्च न्यायालयाने क्रुज ड्रग्ज प्रकरणामध्ये आज तिघांना जमीन दिलाय, दोघांना कालच दिलाय. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये एनसीबीने युक्तीवाद केला तो पाहता हे प्रकरण खालच्या कोर्टामध्येच जामीन देण्यासारखं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

एनसीबीचे वकील रोज नवीन नवीन युक्तीवाद करत होते. लोकांना जास्त दिवस कसं तुरुंगात ठेवता येईल यासाठी ते युक्तावद करत राहिल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ‘मी आज पुन्हा सांगतोय की हे सर्व प्रकरण फर्जीवाडा आहे.या सर्व पोरांना कुठेतरी वानखेडेंनी जाणूनबुजून अडकवलेलं आहे,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या