‘जावयाला अटक झाल्यानेच नवाब मलिकांची मळमळ’, प्रवीण दरेकर यांचा टोला

मुंबई : एनसीबी ही देशातील एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही त्यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक करता आला नाही असा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला.

‘१२ जानेवारीला रात्री १० वाजता आपले जावई, समीर खान यांना ईडीचे समन्स आले आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले. याची माहिती माध्यमांना आधीच देण्यात आली होती. तसा मेसेज त्याच नंबर वरून करण्यात आला होता. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आले. तसेच जावयाला आठ महिने तुरुंगात राहावे लागले. त्यामुळे मुलीला धक्का सहन करावा लागला असेही मलिक यांनी सांगितले.

यानंतर नवाब मलिक यांनी भाजप आणि एनसीबीवर केलेल्या आरोपांना भाजपच्या वतीने उत्तर देण्यात आले आहे. ‘नवाब मलिक प्रवक्ते आहेत की वक्ते, ते प्रकरण न्यायालयात असताना त्यावर मत मांडणे चुकीच असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. जावयाला अटक झाली त्यावरून मलिक यांची मळमळ जाणवते, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरेकर म्हणाले, ‘एनसीबी कारवाई चुकीची वारंवार सांगणे म्हणजे व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणे, जावयाला अटक योग्य होती हे मान्य न करता यंत्रणेवर दबाव वाढवण्याचे काम नवाब मलिक करत आहे. आपल्या देशात यंत्रणा स्थापित केल्या, अन्याय झाला तर वेगळ्या फोरमवर न्याय मागता येतो. तिथे नवाब मलिक यांनी न्याय मागावा, पण ते न्यायाधीश असल्या प्रमाणेच बोलतात अशी टीकाही दरेकर यांनी केली.

काय म्हणाले होते नवाब मलिक?
मलिक म्हणाले की, माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये दिसत आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही? या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आले आहे. याविरोधात माझा जावई हायकोर्टात जाणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

एनसीबीच्या कारवाईत दोनशे किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. २७ अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबीकडून सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या