भाजपला माझी भीती वाटतेय, म्हणूनच दोन वर्षापूर्वीचा ‘तो’ व्हिडिओ केला वायरल; मलिकांचे स्पष्टीकरण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असतानाच्या नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच ‘शेअर झालेला व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे,’ असे म्हणत वायरल व्हिडीओवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘भाजपकडून दोन वर्षापूर्वीचा व्हिडीओ शेअर झाला आहे, भाजपला माझी इतकी भीती का? मला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे,’ असा आरोप देखील मलिक यांनी यावेळी बोलताना भाजपवर केला.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘गर्दी असल्यामुळे हात वरती करता आला नाही,’ असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले. तसेच मलिक यांच्या या वायरल व्हिडीओवर भाजपचे नेते राम कदम, मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत नवाब मलिक तसेच राष्ट्रवादीवर देखील शाब्दिक निशाणा साधला होता.

वाचा काय आहे प्रकरण ?

रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका