नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, सोशल मिडिया वर व्हिडीओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण आणि हात-पाय तोडण्याची धमकी देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे . हा व्हिडीओ महिन्यापूर्वीचा असल्याची माहिती आहे. माझ्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर मी त्यांना जाब विचारला, परंतु सदर खासगी ठेकेदाराने दुसऱ्या दिवशीही पुन्हा काम सुरु केले होते. अशी माहिती कप्तान मलिक यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले.

मालिकांच्या प्रभागातील कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरु होते. त्या ठिकाणी चार कामगार पाईपमध्ये वायर टाकायचे काम करत होते. प्रभाग क्रमांक ७०चे नगरसेवक असलेले कप्तान मलिक यांनी कामगारांकडे कामाच्या वर्क ऑर्डरची विचारणा केली, मात्र कामगारांनी कोणतीही ऑर्डर दाखवली नाही. त्यानंतर मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याच व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

यावर स्पष्टीकरण देताना कप्तान मलिक म्हणाले, “तो खासगी ठेकेदार होता आणि महापालिकेचं नुकसान करत होता. त्याला आधल्या दिवशी मी समजावलं होतं. त्यांना विनंती करुन काम थांबवण्यास सांगितलं होतं. त्यादिवशी त्यांनी काम बंद केलं. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा काम सुरु केलं. ते दादागिरी करून  काम करत होते. ती दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं.”

पुढे मलिक असेही म्हणाले, ‘महापालिकेकडे किती पैसे भरले ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन दाखवा. त्यांची परवानगी घ्या आणि मग काम करा, असं मी कामगारांना सांगितले होत. मात्र, त्यांच्याकडे एकही परवानगी नव्हती , सगळ विनापरवानगी काम करत होते’

‘तसेच मी मारहाण केली आहे. त्या व्हिडीओत देखील मी सांगितलं आहे की मी चुकीचं केलं तर माझ्यावर तुम्ही केस दाखल करा. मी जर चुकीचं केलं असतं तर त्या लोकांनी माझ्याविरोधात पोलीस तक्रार केली असती.’ असंही कप्तान मलिक म्हणाले.