‘नवाब मलिकजी! आधी स्वतःच्या जिल्ह्याचा आढावा घ्या’, प्रविण दरेकरांचा टोला

प्रविण दरेकर- नवाब मलिक

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘राज्यपालांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही. ते राज्यापाल असल्याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे. या राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे योग्य नाही.’ असं यावेळी नवाब मलिक यांनी बोलून दाखवलं.

तसेच ‘त्यांना विद्यापीठांमध्ये जे काय करायचं आहे ते जाऊ शकतात, करू शकतात. कारण, ते नांदेड विद्यापीठाचे कुलपती आहेत. परभणीच्या कृषी विद्यापीठाचा जो काही आढावा घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतात. पण जे राज्य सरकारचे अधिकार आहेत, जे राज्य सरकारला अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचे कुठेतरी हनन करणे हे योग्य नाही. आम्हाला अपेक्षा आहे की जी काही चूक झालेली आहे, माहिती देण्यात आल्यानंतर ते सुधारतील.’ असंही यावेळी नवाब मलिक यांनी म्हंटले.

त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मालिकांचे कान ओढले आहे. ते म्हणले, ‘महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही. नवाब मलिकजी त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या! नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील.’ असे ते म्हणले.

महत्वाच्या बातम्या