कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळं जग पिवळं दिसतं; नवाब मलिक कडाडले

blank

टीम महाराष्ट्र देशा : नवाब मलिक हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहीर आहेत. मात्र आमदारांना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजनशून्यता आहे. कामकाज सल्लागार समिती तारांकित प्रश्नांपासून आमदारांना रोखण्यासाठी नव्हती, असे राम कदम म्हणाले होते.

भाजप नेते राम कदम यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते व आमदार नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. मलिक म्हणाले, ‘आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्यं करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोला आमदार नवाब मलिक यांनी लगावला.

तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले, कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था भाजपचे आमदार राम कदम यांची झालेली दिसते, असे मलिक म्हणाले.

दरम्यान, भाजपला याची माहिती नाही किंवा खोटा प्रचार करण्याचा त्यांचा अजेंडा आहे, असा आरोप मलिक यांनी केली. आता या व्यक्तव्यावरून भाजप नेते राम कदम आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात वादाची ठीणगी पडली आहे.

महत्वाच्या बातम्या