भाजप आता जोरजबरदस्तीवर आली आहे : नवाब मलिक

शाळांमध्ये पंतप्रधान मोदींवर आधारीत लघुपट दाखवण्याचा सरकारचा ‘फतवा’

टीम महाराष्ट्र देशा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा ‘फतवा’ महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. सरकारच्या या आदेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला आहे. भाजप आता जोरजबदस्तीवर आली असून शाळांवर जबरदस्ती करून प्रचार करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे असा आरोप मलिक यांनी केला.

दरम्यान हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर मोठा वादंग उसळला होता. आता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे. पुढे बोलताना मलिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आता घसरत चालली आहे. एखाद्या पक्षाच्या प्रचारासाठी शाळांचा उपयोग करणे योग्य नाही. शाळा प्रशासनाने या आदेशाचा कडाडून विरोध करायला हवा असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

You might also like
Comments
Loading...