मनसेच्या इंजिनाला आघाडीने दाखवला ‘रेड सिग्नल’

blank

मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र राज ठाकरेंना आघाडीत समविष्ट करून घेण्यास दोन्ही कॉंग्रेसचा विरोध असल्याचं राष्ट्रवादीने हे स्पष्टीकरण दिलंय.

राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत घ्यायचं नाही असा दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला आहे, शरद पवार आणि राज ठाकरे यांची रविवारची भेट ही त्यांची वयक्तिक भेट होती. या भेटीमागे कोणतही राजकीय कारण नव्हतं असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे. या दोनही बड्या नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हे स्पष्टिकरण दिलंय.

राज यांच्या कार्यपद्धीत परिवर्तन होत असेल तर स्वागत आहे पण त्यांच्या कार्यपद्धतीत काही फरक पडला असं अजुन दिसत नाही असं मतही मलिक यांनी व्यक्त केलं. रविवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चाही झाली आहे. ही भेट राजकीयच असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या स्पष्टीकरणाला महत्त्व आहे.