‘…याला पुनावाला स्वतः जबाबदार; त्यांना कोण बदनाम करत नाहीये’

nawab malik

मुंबई – देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली असून देशात दररोज रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

एका बाजूला ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज अनेकांच्या भुवया उंचावतील असे वक्तव्य केले आहे. केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले आहे.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी वरील माहिती दिली. सुरुवातीला राज्याला ४०० रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले मग त्यांनी ३०० रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत. ज्यापध्दतीने ४०० रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्वीट करुन ३०० रुपयाला द्यायला तयार आहे असे सांगितले. हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या