मुंबई: राज्यभरात नुकतेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक मतदारसंघातून महाविकास आघाडी सरकार आपापल्या जोरावर लढली आहे. त्यामुळे भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कॉंग्रेसला देखील काही राजकीय सल्ले दिले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीतही नगरपंचायत निकालासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असला तरी महाविकासआघाडीचे एकत्र संख्याबळ जास्त आहे. त्यादृष्टीने भविष्यात कशाप्रकारे निवडणुका लढवायच्या याविषयीच्या रणनीतीसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे देखील उपस्थित होते. नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. मलिक म्हणाले, नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोण कितव्या क्रमांकावर आहे, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. हे निकाल पक्षांच्या स्थानिक ताकदीनुसार लागले आहेत. परंतु, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जमतंय, ही गोष्ट भाजपला पचत नाही. इतकी वर्षे सोबत असणाऱ्या मित्रपक्षाचा केसाने कसा गळा कापायचा, ही गोष्ट आम्ही भाजपकडून शिकलेलो नाहीत. भाजपने राज्यात शिवसेनेचे कशाप्रकारे खच्चीकरण केले, हे सर्वांना माहिती आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
-
स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे, किरण माने यांच्यासोबतच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले
-
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र अव्हाडांनी दिला कॉंग्रेसला मोलाचा सल्ला
-
अभिमानास्पद! औरंगाबादच्या क्रांती चौकात वर्षाचे ३६५ दिवस फडकणार तिरंगा
-
टीव्ही अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचं कोरोना इन्फेक्शनमुळे निधन