चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी भाजपला मतदान करत नाही – मलिक

टीम महाराष्ट्र देशा : उद्या माझ्या पत्नीने जरी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी शिवसेनेचाच प्रचार करणार असे चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलं होत. त्याच वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी भाजपला मतदान करत नाही अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी खुद्द स्वतः दिली आहे अशा आशयाच ट्विट केलं आहे.

चंद्रकांत पाटील येत्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांना मदत करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरचं नवाब मलिक यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला कोल्हापूरमधल्या शिवसेनेच्या दोन जागांपैकी एक जागा स्वतःच्या पदरात पडून घेयची इच्छा होती. पण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जागा या शिवसेनेकडेच राहणार असल्याच स्पष्ट केले.