‘राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत’

nawab malik

मुंबई – राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे.विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीत धुसफूस सुरु अश्या बातम्या पसरत आहेत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहे यावर नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणूकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत.परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही.मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला