राजकीय द्वेष पसरवण्यासाठीच मदरश्यांबाबत ‘ती’ मागणी भाजपने केली – राष्ट्रवादी

madarsa

मुंबई :आसाममधल्या भाजप सरकारने मदरशाचे अनुदान बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. याच निर्णयाचे अनुकरण करून हिंदुत्ववादी सरकारने आपले खरे हिंदुत्व दाखवून द्यावे अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर पुढे म्हणाले की, मदरश्यांमध्ये कोणतंही आधुनिक शिक्षण न देता एका विशिष्ट धर्माचेचं शिक्षण दिले जाते यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.तसेच मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी.या अर्थाने भातखळकर यांनी थेट सरकारला ओपन चँलेंज दिले आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. सुडबुद्धीने… राजकीय द्वेष पसरवण्यासाठी… जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाची लोकं मदरशाचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मदरशामधील विद्यार्थ्यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रतिमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. ही योजना बर्याच काळापासून राज्यात सुरू आहे. भाजपचे सरकार असताना ही योजना सुरूच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत हे कितपत योग्य असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

राजकीय दृष्टीकोन ठेवून ही मागणी होत आहे. त्यांच्या काळात हज का बंद केले नाही याचं आत्मचिंतन करावं आणि मग अशा प्रकारची मागणी करावी असे आव्हान राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-