राज्याचे शिक्षणमंत्री बोगस असल्यामुळे राज्यातील शिक्षणाचे वाटोळे झाले – नवाब मलिक

vinod tawade sad

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे बोगस असल्यामुळे राज्यातील शिक्षणाचे वाटोळे झाले आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा १० वीचा निकाल लागला, दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा निकाल कमी लागला. यावरून नवाब मलिक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला. शिक्षणविभागाने १० वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत गुण दिले नसल्यामुळे यंदाचा राज्यातील १० वीचा निकाल कमी लागला. त्यामुळे प्रवेशावेळी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हंटले.

याचबरोबर, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे बोगस आहेत, त्यामुळे राज्यातील शिक्षणाचे वाटोळे झाले आहे. अशी टीकाही मलिक यांनी केली.