शेतकरी दुष्काळाने हैराण, राज्य सरकार गुजरातच्या कंपन्यांवर मेहरबान

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, यामध्ये राज्य सरकार उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. आता गुजरातच्या टोरंट कंपनीला २८५ कोटींची थकीत कर्जमाफी दिल्याने विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

गुजरातच्या टोरंट कंपनीला २८५ कोटींची थकीत कर्जमाफी देत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे गुजरात प्रेम दिसून आले, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असताना शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून श्रीमंतांची कर्ज माफी करणारे हे भाजप सरकार सर्वसामान्यांचे नसून धनदांडग्यांचे आहे हे स्पष्ट झाले. असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.