नौदलाने सीमेवर लढावं, सरकारच्या कामात अडथळा आणू नये : नितीन गडकरी

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचं भूमीपूजन नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं

मुंबई : नौदलाला विरोध करण्याची सवय झालीये. मलबार हिलमध्ये तरंगत्या हॉटेल विरोध करण्याचं कोणतही कारण नसताना नौदलाने विरोध केला, तसेच मलबार हिलमध्ये आक्षेप घेण्याच काय कारण असा प्रश्न उपस्तीत करत त्यांचं काम सीमेवर लढण्याचं आहे विरोध करण्याचं नाही अशी नाराजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचं भूमीपूजन नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी नितीन गडकरींनी भारतीय नौदल आण सरकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. नौदलाचा काम हे सरकारला विरोध करण्याच नाहीये. तर सीमेवर जाऊन देशाचं संरक्षण करण्याचं आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईत राहायचंय. यासाठी ते माझ्याकडे दक्षिण मुंबईत जागा मिळावी या मागणीसाठी आले होते. पण आम्ही त्यांना एक इंचही जागा देण्यास विरोध केला होता. नौदलाने मलबार हिलमध्ये प्रस्तावित तरंगत्या हॉटेल प्रकल्पाला विरोध केला. कोर्टाने नकार दिल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळावा लागला अशी नाराजी गडकरींनी बोलून दाखवली.

त्याचबरोबर मुंबईत जलमार्ग विकसित होण्याची गरजही गडकरींनी बोलून दाखवली. येत्या काळात 10 हजार सी प्लेन सुरु करण्याचा विचार आहे. लोक रस्त्यावरून समुद्रात आणि परत रस्त्यावर प्रवास करू शकतील, असा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. शिवाय प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करणं आणि इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचार असल्याचं गडकरींनी सांगितलं.

You might also like
Comments
Loading...