सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ९ महिलांचा सत्कार

मुंबई : आपल्या कर्तृत्वावर विविध क्षेत्रात ठसा उमटविणा-या महिलांचा ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ९ महिलांना नवशक्ती, नवचेतना आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भांडुपच्या सावली फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुरोगामी महाराष्ट्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला आपल्या कर्तृत्वावर सर्व क्षेत्रात ठसा उमटवत आहे. अशा कर्तबगार आदर्श नऊ महिलांचा सत्कार करण्यात आल्याची प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...