नवरात्रोत्सव : बघा करवीरनिवासिनी अंबाबाईची आजची मनमोहक पूजा

ambabai

कोल्हापूर : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आदिशक्तींची पूजा देशभरात या काळात केली जाते. महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात.

मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचेदेवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.

आज सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात देखील घटस्थापना करण्यात आली. प्रथेप्रमाणे सुरुवातीला तोफेची सलामी देऊन या उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी लाखो भक्तांनी फुलणारा मंदिर परिसर मात्र यंदा ओस पडलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिराच्या चारही दरवाजांजवळ चोख बंदोबस्त ठेवला असून भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तर कोल्हापूर शहरात १० हुन अधिक ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्यामुळे आपल्या आंबिकेच रूप डोळे भरून बघण्याचं सुख कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.

आज पहिल्या माळेला महालक्ष्मीची महाशक्ती कुण्डलिनीच्या रूपातील मनमोहक रूपातील पूजा मांडण्यात आली आहे. बघा आदिमायेचे आजचे रूप-

महत्वाच्या बातम्या-