श्रीगौड ब्राम्हण समाज सार्वजनिक नवरात्रोत्सव उत्साहात साजरा

बिबेवाडी परिसरातील श्रीगौड ब्राम्हण समाज सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.या वर्षी मंडळातर्फे अनेक सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिलांसाठी होम मिनिस्टर यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेतील विजेत्यांना ५ ऑक्टोबरला पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

महिला भजनी मंडळासाठी भजन गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कला,संस्कुर्ती सादर करणाऱ्या अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी लकी ड्रॉ, लहानमुलांसाठी फॅन्सी ड्रेस,लाइव्ह दांडीया,हळदी कुंकू आयोजन करण्यात आले होते.

पंडित देवेंद्र यांचे प्रवचन,महिला पुरुष भजनी मंडळ स्पर्धा ,अपर्णा तीर्थंकर यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले होते.,दीपक राठोड यांचे भजन,संगीत सुंदर कोड अशा अनेक बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य यादवराजजी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या.

५ ऑक्टोबर रोजी या उत्सवातील स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कार्यकारणीचे अध्यक्ष प्रकाश लालुरामजी शर्मा यांनी दिली.याप्रसंगी प्रवीण डांगी, सेक्रेटरी नेमीचंदजी बोलद्रा, मांगीलालजी उजेचा, उपस्थित होते .