डोंबिवलीत नवरात्रीचा उत्साह शिगेला..! खासदार शिंदे यांच्या ‘रासरंग’ची तरुणांवर जादू..!

ठाणे/प्राजक्त झावरे-पाटील : नवरात्री महोत्सवाचा जल्लोष ऐन शिगेला पोहचला आहे. शनिवार-रविवार तर दांडिया रसिकांसाठी पर्वणीच ठरत आहेत. सध्या मुंबई,ठाण्यासह संबंध महाराष्ट्रात नवरात्रीच्या रंगांची उधळण होत आहे. विशेषतः मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये नवरात्रीची अधिकची धूम पाहायला मिळत असते. नेहमीच अधिकतर तरुण-तरुणी यांचा ओढा तिकडेच दिसून येत असतो. परंतु गेल्या काही वर्षात ठाणे व परिसरात देखील नवरात्रीची धून गाजू लागली आहे. यातच सांस्कृतिक उपराजधानी असणारी डोंबिवलीत देखील मागे नाही. ठाणे सोडाच मुंबईतील मोठ्या नवरात्री महोत्सवाना देखील मागे टाकत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे ‘ डोंबिवली रासरंग’ व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ‘ नमो रमो नवरात्रोत्सव’ मोठ्या धूम-धडाक्यात संपन्न होत आहेत.

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या पेटाऱ्यातून ‘रासरंग डोंबिवली’ हा नवरात्रोत्सव गेली काही वर्षे सुरू आहे. वेगवेगळे समाजपयोगी कार्यक्रम या फाऊंडेशन मार्फत राबवले जातात. अंबरनाथ ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिवल’ या अनोखा व आर्ट फेस्टिव्हल मध्ये मैलाचा दगड ठरणारा कार्यक्रम देखील याच फाऊंडेशनचा आहे.

सध्या ‘रासरंग ‘ हा डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील युवकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. खासदार डॉ. शिंदे हे त्यांच्या कार्याची, तत्परतेने, शिक्षणाने आधीच युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेतच परंतु ‘उत्सवप्रिय पिढीची’ नस ओळखून त्यांनी सुरू केलेला हा सुमधुर संगीताचा ‘रासरंग’ डोंबिवलीचा मानबिंदू ठरत आहे.

डॉ. शिंदे यांचा ‘रासरंग’ व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ‘नमो रमो नवरात्रोत्सव’ एकाच भागात सुरू आहेत. त्यासोबतच आजूबाजूला अजून बरेचसे उत्सव देखील आहेतच परंतु ‘रासरंग’ने उभी केलेली नाविन्यता व ‘विशेषता’ इतर सगळ्या उत्सवांपेक्षा उजवी ठरत आहे. त्यामुळेच तरुणांचा प्रचंड प्रतिसाद ‘रासरंग’ला भेटत असून हा उत्सव देखील डॉ. शिंदेच गाजवत आहेत.!

ही तर गुरुवर्य दिघे साहेबांचीच प्रेरणा- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

खा. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामातून कल्याणचा सुभा झाला चिरेबंदी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले बेस्ट युथ लीडर…!