नवरात्र उत्सव: आई तुळजाभवानीच दर्शन २४ तास घेता येणार

tuljabhavani

टीम महाराष्ट्र देश : आज पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. आदिशक्तीनंची पूजा या काळात देशभरात केली जाते. महाराष्ट्रात तुळजापूर कोल्हापूर वणी आणि माहूर या साडेतीन शक्तीपिठांवर पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या काळात लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे अजूनहि उघडली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडतील भाविकांना देवीचे जरवर्षी प्रामणे दर्शन घेता येणार नसले तरी मंदिरांच्या व्यवस्थापनाने भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.

तुळजापूरची तुळजाभवानी देवी मोठं शक्तिपीठ आहे. नवरात्रीला तुळजाभवानीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते. यंदा मात्र केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थिती पूजाविधी होत आहे. मात्र तुळजाभवानी संस्थानाने भक्तांसाठी 24 तास आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची सोय केली आहे. आई तुळजाभवानीचं दर्शन भक्तांना घरबसल्या करता येणार आहे. तुळजाभवानीच दर्शन करण्यासाठी खालील युट्युब चॅनेल ला भेट द्या, असे देवस्थान समितीती आवाहन केले आहे.

नवरात्रीच्या पुजेमध्ये नियमांचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. माता दुर्गा नियम आणि कडक शिस्तीसाठी ओळखलं जाणारं देवीचं रुप आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच, घटस्थापनेच्या दिवशी देवीची विधिवत पुजा करणं महत्त्वाचं ठरतं. नवरात्रीच्या पावन पर्वाच्या पहिला दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.

महत्वाच्या बातम्या-