fbpx

रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना पुणे नवरात्र महोत्सवाकडून अभ्यंग स्नान

पुणे: आपण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. तो सण म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश, आनंद घेऊन येणारा म्हणजे दिवाळी. मात्र समाजातील एक घटक असा आहे की जो दिवाळी सण साजरा करीत नाही. मात्र त्या सणाला लागणाऱ्या वस्तू सिग्नलवर विकताना दिसतो. अशाच मुलांसोबत आज पुणे नवरात्रो महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आबा बागुल यांनी दिवाळीची पहाट साजरी केली आहार. यावेळी मुलांना कपडे, मिठाई आणि फटाके वाटण्यात आले.

या उपक्रमा बाबत नगरसेवक आबा बागुल म्हणाले की, मागील ४ वर्षांपासून शहरातील विविध भागातील गरजू आणि वंचित मुलांना अशा प्रकारचे अभ्यंग स्नान घालून दिवाळीचा सण साजरा करीत असून त्याच्या सोबत दिवाळी साजरी केल्याने एक वेगळे समाधान मिळते. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाजात अधिक काम करण्यास ऊर्जा मिळते अशी भावना व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, मी ज्या प्रकारे हे काम करीत आहे. अशा पध्द्तीने समाजातील प्रत्येक नागरिकाने असा उपक्रम राबविल्यास या मुलांना अधिक समाधान मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.