‘नवराई माझी नवसाची गं’; दिशा परमारचे मराठमोळ्या अंदाजात स्वागत

दिशा परमार

मुंबई : ‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाची गेले काही दिवसा पासून चर्चा रंगली आहे. १६ जुलै रोजी राहुल आणि दिशा यांचे लग्न पार पडले. त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल  झाले होते. त्यानंतर आता दिशाच्या गृहप्रवेशाचे देखील काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

गृहप्रवेशाचा व्हायरल झालेल्या या व्हीडीओत दिशाने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करत गुलाबांच्या पाकळ्यांवरून माप ओलांडत वैद्यंच्या घरी प्रवेश केला. यावेळी राहुलच्या आईने दिशाचं ओवाळून स्वागत केले आहे. यावेळी घरातील सगळेच सदस्य उपस्थित असल्याचे  पाहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांचे लग्नाआधीच्या काही कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. राहुल-दिशाच्या लग्नानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या लग्नाला काही सेलेब्रिटीनी देखील हजेरी लावली होती.

‘बिग बॉस’च्या घरात दिशा राहुलला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. तेव्हा राहुलने तिला प्रपोज केलं होतं. यामुळे या अजोडीची चांगलीच चर्चा झाली होती, आणि अखेर हे दोघे विवाह बंधनात अडकले आहे. 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दिशा ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP