मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (२५ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कारागृहात असतांना नवनीत राणा (Navneet Rana) यांना वॉशरूमला जाण्याची परवानगी देण्यात आली नाही, अशी माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली.
यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ज्याप्रकारे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबत व्यवहार करण्यात आला. त्यांनी काय सांगितलं होत? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा बोलू. ते तिथे जाऊन आंदोलन करू असे म्हणाले होते का? परंतु हनुमान चालीसा म्हणण्याकरिता इतका विरोध. हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची?’, असा सवाल फडणवीसांनी केला.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, “एक स्त्री करीत हजारो लोकं जमा करतात, त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस अटक करतात आणि जणू काही पाकिस्तान सोबत युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष करतात. एका महिला खासदाराचे नामोहरण करण्याकरिता पहिल्या दिवशी रिमांड सेक्शन,आणि दुसऱ्या दिवशी राजद्रोहाचा सेक्शन यापेक्षा हास्यास्पद काय असू शकत. तसेच नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाणीव करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही.” तसेच यासंदर्भात नवनीत राणा यांनी आपल्या वकिलामार्फत लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार केली आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- भोंग्याचा वाद! सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंनंतर फडणवीसांनी फिरवली पाठ
- “अबकी बार GST की मार, लेकर आयी…”, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- “अप्रतिष्ठित माणसाला आमंत्रण देऊन..”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- अंजली दमानिया शिवसेनेवर संतापल्या; म्हणाल्या, “बाई या शब्दाचा…”
- “नाशिकच्या रामकुंडापर्यंत शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी मंगेशकर कुटुंबियांना मदत केली पण…”, छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य