नवनीत राणा यांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या,“ज्या पद्धतीने पोपटाने…”,

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातून आज (८ मे) डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी बोलत असतांना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका करत नवनीत राणा म्हणाल्या की,‘ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत २० फूट खोल खड्ड्यामध्ये गाडू असेल म्हटले होते. येणाऱ्या काळात मुंबई आणि महाराष्ट्राची जनता त्यांना खड्ड्यात टाकणार आहे यात काही दुमत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी दिल्लीला जाणार असून त्यांच्याविरोधात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे’, असे राणा म्हणाल्या.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल. रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.’

महत्वाच्या बातम्या: