नवनीत राणांनी गरबा दांडियावर धरला ताल; मात्र कोरोना नियमाचा विसर

nvnit rana

अमरावती : राज्यात सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता. सध्या पद्धतीने नवरात्रौत्सव साजरा करा आणि कोरोना नियमांचे पालन करा असे वेळोवेळी राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मात्र अमरावतीमधील दुर्गा देवी मंडपात खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली असता यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.

दोन दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील नवरात्री दुर्गा मंडळांना भेटी देऊन रास गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला होता. त्यानंतर खासदार नवनीत राणा या काल अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात दुर्गा उत्सव मंडळांना भेटी आणि दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. सध्या याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील एका दुर्गा देवी मंडपाबाहेर सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत गरबा दांडीया खेळल्या. चक्क खासदार राणा गरबा खेळल्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत येत आहे. सर्वसामान्याना कोरोनाचे नियम मग राजकीय लोकांना नाही का? असा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या