Navneet Rana | मुंबई : आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. सरकारच्या या निर्णयानंतर खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
सुरवातीला नवनीत राणा यांनी शिंदे -फडवणीस सरकारच्या या निर्णयाचे अभिनंदन केले आहे, तसेच जनतेच्या हिताचे हे सरकार आहे. पेट्रोल -डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना 50 हजार रुपयेचा अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला, यावर बोलताना, सरकार मागच्या सरकारला ते जमल नाही ते या सरकारने केले असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लागवला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
▪ राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
▪ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
▪ राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
▪ अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
▪ बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
▪ आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “कोकणात आल्यानंतर शरद पवारांच्या गाडीत बसून…” ; जयंत पाटलांचा केसरकरांवर घणाघात
- Sanjay Raut : आमच्या खासदारांचा आकडा जसाच्या तसा राहील; संजय राऊतांचा उदय सामंतांवर पलटवार
- Pratap Sarnaik | “उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला आले नाही…”- प्रताप सरनाईक
- Jayant Patil | “शरद पवार यांनी शिवसेना फोडली नाही”; जयंत पाटलांनी केले पवारांवरील आरोपांचे खंडन
- Chandrakant Khaire : “मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील”; चंद्रकांत खैरेंचा दावा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<