Share

Navneet Rana । “उद्धव ठाकरे बांधावर गेले पण शेतात नाही”; नवनीत राणांचा टोला

Navneet Rana । अमरावती : परतीच्या पावसामुळे मराठावाडा येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची पाहणी करण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठवाडा म्हणजेच औरंगाबाद दौऱ्यावर होते. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. या दौऱ्यावरुन सत्ताधारकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अमरावतीच्या  खासदार नवनीत राणांनीही त्यांच्यावर तोंडसुख घेतलं.

त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बांधावर गेले पण शेतात नाही, तिथूनच पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा पुढे म्हणाल्या, कोणत्या पिकाचं नुकसान झालं आणि कसं नुकसान झालं, ते उद्धव ठाकरेंनी पाहिलं नाही. त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा. अडीच वर्ष काही केलं नाही पण बांधावरच्या नावानं पहिल्यांदा घरातून बाहेर निघाले, असं म्हणत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय.

मी त्यांना शेतात पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं का? असा सवाल करत शेताच्या बाहेरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोमणा नवनीत राणांनी लगावला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी  देखील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून खोचक टीका केली आहे. संबंधित दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे आज १५ मिनिटांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते, याची मी बातमी पाहिली. मला वाटतं की, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेलं तरी २० मिनिटं लागतात. पण १५ मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होतं असेल तर यासारखं आश्चर्य नाही.”

दरम्यान , विरोधकांच्या या टीकेला मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २४ मिनिटांचा दौरा केला, हे पाहण्यासाठी तुम्ही घड्याळ लावून बसले होते का? असा खोचक सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Navneet Rana । अमरावती : परतीच्या पावसामुळे मराठावाडा येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची पाहणी करण्यासाठी काल माजी …

पुढे वाचा

Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now