Share

Navneet Rana | “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पू…”; नवनीत राणांचा शरद पवारांवर निशाणा 

Navneet Rana | अमरावती : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बिहारचा एकदिवशीय दौरा केल्यानंतर त्यांच्यावर दोन्ही बाजूनी टीका केली जात आहे. एकीकडे त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी हा दौरा भविष्याची नांदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली.

“मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार (Sharad Pawar) असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलो करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही,” असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत.” त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्राचं खूप चांगलं झालं असतं,” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील जोरदार टीका केलीय.

दरम्यान, का पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “शिवाजी महाराजांवर असं कोणीही बोलू नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने तर अजिबात बोलू नये. मात्र, यांना पदावरून हटवा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू असं म्हणून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बंद करणं म्हणजे खूप लोकांना अडचणीत आणणं आहे. या पदावर राजकारण करू नये.”

महत्वाच्या बातम्या :

Navneet Rana | अमरावती : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बिहारचा एकदिवशीय दौरा केल्यानंतर त्यांच्यावर दोन्ही बाजूनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now