मुंबई : युवा सेनेने राणा दाम्पत्य यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आता नवनीत राणा व रवी राणा यांना या तक्रारीवरून अटक झाली आहे. पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. आणि त्यांच्या घरातून राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. राणा दाम्पत्य आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. राणा यांनी वारंटची मागणी करत, हाय वोल्टेज ड्रामा केला. दरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत, अटक केले.
राणा यांच्यावर भा. दं. क. १५३ (अ) अन्वये अटक करण्यात आली आहे. यामुळे अखेर पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीवरून राणा दाम्पत्यावर कारवाई केली आहे. कालपासूनच राणा यांच्या आंदोलनाची चर्चा होती. मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. नवनीत राणा यांच्या घराबाहेर ही शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यात होती. अपेक्षेप्रमाणे नवनीत राणा यांच्या विरोधात कारवाई करून पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. आता पोलीस राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :