नवनीत कौर राणा संसदेतून थेट शेतात ; सोयाबीनची केली पेरणी

टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खासदार असूनसुद्धा त्यांनी शेतात जाऊन पेरणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या साधेपणाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Loading...

नवनीत कौर राणा यांनी परिसरातील शेतात जावून तेथील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच पती आमदार रवी राणांसह त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आश्चर्य वाटले. या पेरणीदरम्यान रवी राणा यांनी तीन काकरी तीसा चालवत नवनीत राणांना मदत केली. नवनीत राणा यांना पेरणी करताना पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, कौर यांनी यावेळी बोलताना ‘लोकांच्या दुखा:त आणि सुखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. चांगला पाऊस पडावा अन् बळीराजा सुखी व्हावा अशी भावना व्यक्त केली आहे.Loading…


Loading…

Loading...