सुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत – नवज्योतसिंग सिद्धू

टीम महाराष्ट्र देशा : तारपूर कॉरिडोरच्या मुद्यावरुन अकाली दल आणि भाजपाकडून नवज्योतसिंग सिद्धू यांना टार्गेट केले जात आहे. नवज्योतसिंग सिद्धू वेडे झाले असून त्यांचा आयएसआय आणि पाकिस्तानसोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करत पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार टीका केली होती. शिवाय, सिद्धूंच्या कॉलच्या तपशिलाचीही चौकशी करावी, अशी मागणीही सुखबीर सिंग बादल यांनी केली होती.

दरम्यान, सुखबीर सिंग बादल यांनी केलेल्या आरोपांवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पलटवार केला आहे. सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधताना सिद्धू म्हणालेत की, सुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झाले असतील,तर यात माझी काही चूक नाही. जर त्यांना विचारधारेची बद्धकोष्ठता झाली असेल तर त्यात माझी काहीही चूक नाही, अशी बोचऱ्या शब्दांत सिद्धू यांनी टीका केली आहे.

You might also like
Comments
Loading...