पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंह सिंद्धूंचा तडकाफडकी राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा- पंजाब कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिंद्धूंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे . मागील काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहांसोबतच्या वादानंतर सिद्धूंनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

सिंग यांनी नुकत्याच केलेल्या खातेबदलामुळे सिद्धू प्रचंड नाराज होते.तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत सिद्धू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाला मोठा फटका बसल्याने त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होते. सिद्धू यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.