पाकचा पुळका, नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी

टीम महाराष्ट्र देशा: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पुळका आणणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धूने पाकिस्ताचा पुळका आणत मूठभर लोकांसाठी पाकिस्तानला दोष का देता, असा सवाल केला होता. तसेच पाकिस्तानशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे, असा फुकटचा सल्ला देखील दिला होता. सिद्धूने केलेल्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यामध्ये स्फोट घडवला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला पाकिस्तानला धडा शिकवण्याचि मागणी केली जात आहे. यामध्येच कॉंग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धूने पाकिस्तानसोबत चर्चेने मार्ग काढण्याची भूमिका व्यक्त केली होती. त्यामुळे समाजमाध्यमांवर सिद्धूवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

दरम्यान, कपिल शर्मा शो चालवणाऱ्या वाहिनीने त्यांची तातडीने त्यांची हकालपट्टी केली आहे. या वाहिनीने सिद्धूंना हाकला अशा सूचना शोच्या प्रॉडक्शन हाऊसला केल्या आहेत.

2 Comments

Click here to post a comment