नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट

टीम महाराष्ट्र देशा : इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, यासाठी भारतातील नेत्यांना आणि सेलिब्रेटींंना त्यांनी निमंत्रण दिल होत. मात्र याकडे काहींनी पाठ       फिरवली. तर नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले. यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच त्यांनी तिथं पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात आणि देशात खळबळ उडाली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता पसरली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी सिद्धूंच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करून. ‘सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते. ते मित्रत्वाच्या नात्यानं तिथं गेले असले. तरी मैत्री ही देशापेक्षा मोठी नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेवर भारतीय जवान मारले जात आहेत. अशा परिस्थितीत सिद्धूंनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणं अत्यंत चुकीचं आहे,’ असं अल्वी म्हणाले. सिद्धूंवर टीका करतानाच अल्वी यांनी सरकारलाही याबाबत आरोपीच्या ठरवलं आहे. ‘केंद्र सरकारनं परवानगी दिल्यामुळंच सिद्धू पाकिस्तानात गेले. सरकारनं त्यांना परवानगी नाकारायला हवी होती,’ असं ते म्हणाले. मात्र, सिद्धू यांच्या या गळाभेटीमुळं राजकीय वर्तुळात आणि देशात तीव्र पडसाद उमटत आहेत.

दिनेश कार्तिकच्या जागी कसोटीत खेळणार हा खेळाडू

सांगली : महापौरपद मिळविण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच