fbpx

आता भाजपचे नवे नाव GTU गिरे तो भी टांगउपर

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधनासभा निवडणुकीत कॉंग्रेसने आगेकूच केली आहे. त्यामुळे २०१४ नंतर विजयची घौडदौड करणाऱ्या भाजपच्या अश्वाला कॉंग्रेसने रोखल्याचे बोलले जात आहे. आज लागलेल्या निकालांवरून आता भाजपवर टीकेचे झोड उठली आहे. पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली असून भाजपचे नामकरण त्यांनी GTU अर्थात गिरे तो भी टांगउपर ठेवले आहे.

राहुल गांधी हे मानवतचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. ते सर्वाना सोबत घेवून काम करतात. त्यामुळे भारताचे भविष्य त्यांच्या हाती असल्याचे म्हणत सिद्धू यांनी राहुल गांधींवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोरम राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये आत्तापर्यंतचे कल पाहता भाजपची सत्ता असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसने विजयाकडे वाटचाल केली आहे.