महापौर पदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे अर्ज दाखल

navi mumbai corporation

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची प्रतिष्ठेची असलेली महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे जयवंत सुतार व शिवसेनेतर्फे सोमनाथ वास्कर यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. या वेळी कॉग्रेस महारष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, कॉग्रेसचे नेते भाई जगताप, राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादी व शिवसेना यांचे नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ९ नोव्हेम्बर ला होणार आहे. महापौर शिवसेनेचा बसवण्यासाठी शिवसेनेने अपक्ष, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले होत. यामध्ये राष्ट्रवादीचे चार , भाजप चे सहा आणि कॉग्रेसचे दहा नगरसेवकांना शिवसेनेनं गळाला लावल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यस्तरावर शिवसेना व भाजपमध्ये नाराजी वाढत चालल्याने भाजपने शिवसेनेला मदत न करण्याची भुमिका घेतली.

त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही अंग काढून घेतले. त्यांनतर विजय चौगुले यांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागू नये म्हणून माघार घेतली आहे. मात्र त्याच वेळी जातीच्या दाखलयाची अडचण झाल्याचे सांगत अर्ज भरला नसलयाचे शिवसेनेतर्फे सांगितले जात आहे. महापौर पदाच्या विजयासाठी ५६ मतांची गरज आहे; मात्र राष्ट्रवादीकडे ५२ मते आहेत. त्यामुळे ५ अपक्ष व १० कॉग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावून काँग्रेसला उपमहापौर पदासाठी सहकार्य करण्याची भुमिका राष्ट्रवादीने घेतली. त्यानुसार आज उपमहापौर पदासाठी कॉग्रेसतर्फे मंदाकिनी म्हात्रे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला;

मात्र त्याच वेळी नाराज जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी त्यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचाही उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेनेतर्फे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...