… आज ‘तोच’ नवाजुद्दिन साकारणार ‘बाळासाहेब’

टीम महाराष्ट्र देशा- कधीकाळी रामलीलेत मारीच राक्षसाची भूमिका करण्यापासून नावाजुद्दिन सिद्धीकीला रोखणाऱ्या शिवसेनेला त्याच्या कसदार आणि दमदार अभिनयापुढे अखेर झुकावं लागलं असून आता बाळासाहेबांच्या भूमिकेत स्वतः नावाजुद्दिन पहायला मिळणार आहे .शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ ठाकरे’ या सिनेमाच गुरुवारी मोठ्या दिमाखात ट्रीझर लौंच करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला.

thakray movie

ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार नवाजुद्दीन मुजफ्फरनगरमध्ये गावातल्या रामलीलामध्ये सहभागी होणार होता. यामध्ये तो मामा मारीचचा रोल साकारणार होता. या नाटकाची रंगीत तालीम देखील जोरदार सुरु होती. याबद्द्लच्या बातम्या वृत्तपत्रात छापून येत होत्या मात्र शिवसेनेचे मुजफ्फरनगरचे प्रमुख मुकेश शर्मा यांनी रामलीलाच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये ‘दीन’ नावाच्या कोणत्याही व्यक्तीने भूमिका केलेली नाही, नावाजुद्दिन हा एक मुस्लीम आहे त्यामुळे त्याचा कार्यक्रम आम्ही होवून देणार नसल्याच सांगितल. यावरून बराच वादंग देखील झाला. पुढे शिवसेनेकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांना नवाजला रामलीलेत सहभाग घेवून न देण्यास सांगितले. अखेर हा कार्यक्रमच रद्द करावा लागला

आपण त्यावेळी नवाजुद्दिनने केलेले ट्विट पाहिल्यास आपल्याला सर्व काही कळून येईल. रामलीलामध्ये काम करण्याचे नवाजची लहानपणी पासूनचे स्वप्न होते. ती संधी देखील मिळाली मात्र ऐनवेळी शिवसेनेकडून झालेल्या विरोधाने त्याचे स्वप्न भंगले. आज आपण पाहिलं तर त्याने साकारलेल्या भूमिकांच्या जोरावर त्याला थेट हिंदूह्र्दय सम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तेही एकेकाळी मुस्लीम म्हणून रामलीलेत भाग घेण्यास रोखणाऱ्या शिवसेनेकडूनच….